हा पाऊस पण ना...!!
ओल्या करतो जखमा जुन्या हा पाऊस पण ना आठवणीनी ओंजळ भरतो हा पाऊस पण ना हातामधूनी निसटून गेल्या त्या क्षणांना पुन्हा अलगद जिवंत करतो पाऊस पण ना तिच्या वेणीचा गजरा श्वासात जपलेला त्यां गंधाला गंधित करतो पाऊस पण ना तिचे हसणे तिचे बोलणे तिचे लाजणे डोळ्यासमोर उभे करतो पाऊस पण ना ती मिठी अन साक्षीदार ते चंद्र तारे सारे सारे डोळ्यामधूनी रिते करतो पाऊस पण ना क्रूरच असतो काळीजवेणा देतो जीवा अत्तराची कूपी खोलतो पाऊस पण ना..,,!!! *प्रकाश नाईक*८३७८८४९५९५