Posts

मातंग समाजाच्या प्रबोधन चळवळीतील बिनीचा शिलेदार - शंकरराव भोरे

 ज्येष्ठ साहित्यिक, विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि मातंग समाजाच्या चळवळीतील पहिल्या पिढीचे बिनीचे शिलेदार शंकरराव भोरे गुरुजी तथा अण्णा यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनाने मनाला प्रचंड वेदना झाल्या. त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो.     अण्णांचा जन्म 1933 चा. त्यांचे वडील तमाशा कलावंत होते. त्याच कलेचा प्रभाव आणि संस्कार अण्णांच्यावर होता तो त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबितही झाला. स्वातंत्र्यपूर्व काळातील मातंग समाजाची स्थिती किती हलाखीची  असेल याची कल्पनाच केलेली बरी! पण त्याही काळात अण्णा शिकले. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटलं होतं. त्यांचा पिंड कलावंताचा तसाच कार्यकर्त्याचा आहे शिक्षणाशिवाय मातंग समाजाला तरुण उपाय नाही हे त्यावेळी ओळखणारा हा माणूस! स्वतः शिकलेच पण असंख्य विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम अण्णांनी केलं. सातवी पास झाल्यानंतर ते शिक्षक झाले आणि एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला. कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी करत असताना त्यांना असंख्य अडचणी आल्या.जातीचे चटकेही बसले परंतु शांतपणे अण्णांनी आपलं काम सुरूच ठेव...

आपकी याद आती रही रातभर

 *आपकी याद आती रही रात भर* 'आपकी याद आती रही रात भर ' हे १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गमन'  या चित्रपटातलं गाणं ऐकलं आणि मनात एक वेगळंच काहूर माजलं. स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेलं आणि छाया गांगुली यांच्या आवाजातलं हे गाणं मनाला स्पर्शून जाणारंच आहे.रात्र गडद होत जाते आणि कोणीतरी आठवत राहतं. तेव्हा त्या आठवणीतून मनामध्ये निर्माण होणाऱ्या आनंदलहरी किंवा दुःखाचा आर्तस्वर  यांच्या विविध रंगछटा आपल्याला या गाण्यामध्ये दिसतात. जेव्हा या गाण्याची माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की हे गाणं मखदूम मोईद्दीन या उर्दू शायराचं आहे.त्यांच्या लेखणीतून साकारलं  आहे. मखदूम मोईद्दीन हे नाव उर्दू साहित्य रसिकांना परिचित आहेच.  ४ फेब्रुवारी १९०८ रोजी  मेडक येथे जन्मलेले मखदूम मोईद्दीन हे उर्दूतले एक जानेमाने शायर तथा इन्कलाबी कवी! ऊस्मानिया  विद्यापीठाची त्यांनी  पदवी घेतली. प्रगतिक विचारांच्या जनवादी चळवळीमध्ये ते सक्रिय झाले आणि कष्टकऱ्यांच्या ,श्रमिकांच्या चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले .प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनची त्यांनी हैदराबाद मध्ये स्थापना...

 *अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वैज्ञानिक विचार* 

 *अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वैज्ञानिक विचार*       सत्यशोधक अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्य विश्वातील एक महत्त्वाचं नाव. आपल्या समग्र साहित्यातून त्यांनी माणसाच्या महानत्वाचा विचार पेरण्याचे काम केले .त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू माणूस हाच होता. ज्या अन्यायी शोषणवादी व्यवस्थेने माणसाला चिरडले ,भरडले अशा व्यवस्थेच्या विरोधात आपल्या शब्दांच्या माध्यमातून एल्गार पुकारण्याचे काम अण्णा भाऊ साठे यांनी केले.मानवतावादी व लोकशाहीवादी विचार मूल्यांचा जागर अण्णाभाऊंच्या साहित्यातून दिसून येतो. विषमतावादी जातीव्यवस्थेमुळे त्यांना अवघ्या दीड दिवसांची शाळा शिकता आली.त्यानंतरच्या संघर्षमय जीवनात त्यांनी जे अनुभवलं तेच त्यांनी साहित्यात मांडलं. ३२ कादंबऱ्या,१४ कथा संग्रह ,११लोकनाट्ये, १३ पोवाडे, १प्रवासवर्णन, १ नाटक अशी विपुल साहित्य संपदा निर्माण केली. या समग्र साहित्यातून त्यांनी विज्ञाननिष्ठा आणि मानवी मूल्यांचा उद्घोष केला. त्यांच्या साहित्यातून विवेकी,बुद्धिप्रामाण्यवादी विच...

*माणसाच्या मुक्तीसाठी लढणारा महापुरुष- स्वामी विवेकानंद*

*माणसाच्या मुक्तीसाठी लढणारा महापुरुष- स्वामी विवेकानंद*   प्रस्थापित भारतीय समाजव्यवस्थेला हादरे देणारा आणि भारताला आधुनिक बनविण्यासाठी संघर्षरत असणारा महापुरुष म्हणून स्वामी विवेकानंदांकडे पहावे लागते. परंतु स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा गाभा समजून न घेता त्यांना एका विशिष्ट धर्माशी जोडून ठेवणे हे  त्यांच्यावर अन्याय करण्यासारखेच आहे. स्वामी विवेकानंदांनी  हिंदू धर्माच्या अंगाने जरुर मांडणी केली असली तरी त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोन हा निश्चितपणे पारंपरिक पद्धतीचा नव्हता. धर्माच्या पलिकडे जाऊन खर्‍या अर्थाने माणसाचा सन्मान करणारा असा विचार त्यांच्या जीवनाचा गाभा होता, असे दिसून येते. ख्रिश्चन, इस्लाम आणि बौद्ध धर्म परंपरेतील माणसाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी स्वीकारून खऱ्या अर्थाने एक निखळ मानव्याचा विचार प्रस्थापित करणे, रुजवणे हेच विवेकानंदांचे ध्येय होते. त्यांनी केलेली भाषणे आणि त्यांनी मांडलेले विचार आपण सूक्ष्मपणे तपासून घेतले तर स्वामी विवेकानंद हे भारताला कशाप्रकारे बदलवू पाहत होते, हे नीटपणे लक्षात येते.त्यांचे वडील विश्वनाथ बाबू हे कोलकत्यातील एक नामांकित ...

मिस यू एनडी सर!

*मिस यू एनडी सर!*         साधारणतः  बारा-तेरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे .कोल्हापूर शहरामध्ये काही सनातनी विचारांच्या मंडळींनी यज्ञ करण्याचं ठरवलं. हा यज्ञ विश्वशांतीसाठी आहे असं संयोजकांकडून सांगण्यात आलं होतं. या यज्ञामध्ये शेकडो लिटर तूप, तेल आणि खाद्यपदार्थांची आहुती दिली जाणार होती. कोल्हापूर खरंतर शाहूंची नगरी आहे. शाहूंच्या विचारांची नगरी आहे. एका बाजूला सगळा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आणि इथला शेतकरी अडचणीत असताना आपण अशा प्रकारची अन्नाची नासाडी करून अवैज्ञानिक आणि अविवेकी अशा प्रकारचा यज्ञ करणं, हे काही बरोबर नाही असं कोल्हापुरातल्या काही मंडळींचं म्हणणं होतं. परंतु यज्ञाचे संयोजक इरेला पेटले होते .यज्ञ करणं हे  आमचं स्वातंत्र्य आहे, असे म्हणून त्यांनी यज्ञ करणारच अशी भूमिका घेतली होती. दुसऱ्या बाजूला जनमत मात्र यज्ञाच्या विरोधात एकवटत होतं. आणि कोल्हापुरातल्या सर्वच परिवर्तनवादी, पुरोगामी विचारांच्या संस्था संघटनांनी या यज्ञाला प्रचंड मोठा विरोध केलेला होता. शेवटी या यज्ञाच्या विरोधात मोर्चा काढण्यात ठरलं. त्या मोर्चाचे नेतृत्व करत होते...

*पऱ्या*

Image
                                         माझं बालपण सरंद या संगमेश्वर तालुक्यातील  ठिकाणी गेलं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या बालपणीच्या आठवणी म्हणजे मोरपिसा सारख्या असतात. बालपणीच्या या  आठवणी म्हणजे खरंच मधाच्या पोळ्यासारख्या असतात. आमचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील सरूड हे असलं तरी माझे पप्पा कामाच्या निमित्तानं संगमेश्वर तालुक्यातल्या सरंद या ठिकाणी स्थायिक झालेले. माझा जन्म सरंदेत झाला नाही पण  सगळं बालपण मात्र इथंच गेलं. इथल्या असंख्य आठवणी मनात रुंजी घालतात.आम्ही जिथे रहायचो  ते ठिकाण एका ओढ्याच्या काठावर होतं. आता त्या मोठ्या ओढ्याला तिथल्या बोलीभाषेमध्ये पऱ्या  असं म्हटलं जायचं. पऱ्या म्हणजे एक  ओढा . डोंगर कपारीतून वाहणारे असंख्य छोटे-मोठे ओढे-नाले या  पऱ्याला मिळायचे आणि त्या सगळ्या ओढ्यांना नाल्यांना आपल्या पोटात सामावून तो पऱ्या गड नदीच्या दिशेने सुसाट वेगाने वाहत राहायचा.वयाची चाळीशी गाठल्याव...

अण्णा,डोक्यात अंधार असला की,बाहेरचा उजेड कसा दिसणार?

*अण्णा, डोक्यात अंधार असला की, बाहेरचा उजेड कसा दिसणार?*                             अण्णा हजारे नावाच्या व्यक्तीने मंदिरे उघडण्याची सरकारकडे मागणी केली आहे, असे वृत्त माझ्या वाचनात आले.प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहेच.पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी असेही म्हटले आहे की ,मंदिर उघडली पाहिजेत आणि त्यासाठी मी आंदोलन करणार आहे. शाळा उघडण्याची काही गरज नाही कारण शाळेत जाऊन तसेही शिक्षक काय उजेड पाडतात? असा अण्णांनी प्रश्न केला आहे. या वाक्याचा मी  भारतीय नागरिक म्हणून तीव्र निषेध करतो. कारण अण्णा हजारे यांच्यासारख्या माध्यमांनी मोठ्या केलेल्या एका माणसाने असे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे निषेधार्ह आहे. त्याचबरोबर  शिक्षकांवर अविश्वास दाखवणारे आहे. शिक्षकांचा अवमान करणारे आहे. खरंतर अण्णा हजारे यांच्या भूमिकांबद्दल आणि त्या भूमिकांमधील दुटप्पीपणाबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. गेल्या वीस पंचवीस वर्षाचा त्यांचा इतिहास जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर अण्णा हजारे हे किती दुटप्पी, ढोंगी आहेत ,हे आपल्या ल...