आपकी याद आती रही रातभर
*आपकी याद आती रही रात भर* 'आपकी याद आती रही रात भर ' हे १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गमन' या चित्रपटातलं गाणं ऐकलं आणि मनात एक वेगळंच काहूर माजलं. स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेलं आणि छाया गांगुली यांच्या आवाजातलं हे गाणं मनाला स्पर्शून जाणारंच आहे.रात्र गडद होत जाते आणि कोणीतरी आठवत राहतं. तेव्हा त्या आठवणीतून मनामध्ये निर्माण होणाऱ्या आनंदलहरी किंवा दुःखाचा आर्तस्वर यांच्या विविध रंगछटा आपल्याला या गाण्यामध्ये दिसतात. जेव्हा या गाण्याची माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की हे गाणं मखदूम मोईद्दीन या उर्दू शायराचं आहे.त्यांच्या लेखणीतून साकारलं आहे. मखदूम मोईद्दीन हे नाव उर्दू साहित्य रसिकांना परिचित आहेच. ४ फेब्रुवारी १९०८ रोजी मेडक येथे जन्मलेले मखदूम मोईद्दीन हे उर्दूतले एक जानेमाने शायर तथा इन्कलाबी कवी! ऊस्मानिया विद्यापीठाची त्यांनी पदवी घेतली. प्रगतिक विचारांच्या जनवादी चळवळीमध्ये ते सक्रिय झाले आणि कष्टकऱ्यांच्या ,श्रमिकांच्या चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले .प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनची त्यांनी हैदराबाद मध्ये स्थापना...