*अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वैज्ञानिक विचार*
*अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वैज्ञानिक विचार* सत्यशोधक अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्य विश्वातील एक महत्त्वाचं नाव. आपल्या समग्र साहित्यातून त्यांनी माणसाच्या महानत्वाचा विचार पेरण्याचे काम केले .त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू माणूस हाच होता. ज्या अन्यायी शोषणवादी व्यवस्थेने माणसाला चिरडले ,भरडले अशा व्यवस्थेच्या विरोधात आपल्या शब्दांच्या माध्यमातून एल्गार पुकारण्याचे काम अण्णा भाऊ साठे यांनी केले.मानवतावादी व लोकशाहीवादी विचार मूल्यांचा जागर अण्णाभाऊंच्या साहित्यातून दिसून येतो. विषमतावादी जातीव्यवस्थेमुळे त्यांना अवघ्या दीड दिवसांची शाळा शिकता आली.त्यानंतरच्या संघर्षमय जीवनात त्यांनी जे अनुभवलं तेच त्यांनी साहित्यात मांडलं. ३२ कादंबऱ्या,१४ कथा संग्रह ,११लोकनाट्ये, १३ पोवाडे, १प्रवासवर्णन, १ नाटक अशी विपुल साहित्य संपदा निर्माण केली. या समग्र साहित्यातून त्यांनी विज्ञाननिष्ठा आणि मानवी मूल्यांचा उद्घोष केला. त्यांच्या साहित्यातून विवेकी,बुद्धिप्रामाण्यवादी विच...