Posts

Showing posts from March, 2021

छ.शाहू महाराज,भास्करराव जाधव आणि आमचं सरुड

११मार्च १९१८ रोजी भास्करराव जाधव यांच्या हस्ते सरुडच्या(ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर ) सोसायटीचे उद्घाटन झाले होते.यानिमित्त राजर्षी शाहू महाराज ,भास्करराव जाधव आणि सरुडच्या संबंधांवर टाकलेला प्रकाशझोत!! *राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भास्करराव जाधव आणि आमचं सरुड!*                                   कोल्हापूर ही समतेची भूमी म्हणून ओळखली जाते ती छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारकार्यामुळे. शंभर सव्वाशे वर्षापूर्वी याच कोल्हापुरातून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी संपूर्ण जगाला दिशा देणारा एक समतेचा विचार मांडला. अनेक दूरगामी  परिणाम करणारे निर्णय अत्यंत द्रष्टेपणाने घेतले.  त्या सनातनी धर्म व्यवस्थेच्या पेकटात लाथ घालण्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय सुद्धा घेतले. छत्रपती शाहू महाराज खऱ्या अर्थाने लोकराजे  होते. सामान्य जनतेप्रती त्यांची तळमळ ते सातत्याने व्यक्त करत राहिले .माणसांच्या दुःख वेदनांवर फुंकर घालण्यासाठी त्यांनी आपली राजसत्ता पणाला लावली. व्यवस्थेनं नाकारलेल्या अलक्षित समुद...