साहित्यप्रेमी खा.राजीव सातवसाहेब
*साहित्यप्रेमी खा.राजीव सातव* काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ,राज्यसभा सदस्य खासदार राजीवजी सातव यांचं काल निधन झालं. गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून ते पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असे सांगण्यात येत होते.परंतु काल अचानक त्यांची तब्येत खूपच खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचा एक अभ्यासू, विचारी, सुसंस्कृत आणि तरुण चेहरा म्हणून खासदार राजीव सातव यांच्याकडे पाहिले जात होतं. काँग्रेस पक्षामध्ये हायकमांडशी जुळवून घेणारे आणि नेतृत्वाची हांजी हांजी करणारे अनेक लोक असतील परंतु खासदार राजीव सातव यांचा पिंड आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व वेगळं होतं. गांधी घराण्याशी ते नक्कीच निष्ठा ठेवून होते परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता आणि जनसामान्यांबद्दलची अपार कणव यावरही निष्ठा होती. आणि याच निष...